संग्राहक – डॉ.नंदा आपटे
खटवे - पायाच्या बोटातील दागिना (जोडवी)
खडकणे - ऊन्हात वाळून कोरडे, कडक होणे.
खंडकाम - खंडाने देण्याचे काम.
खडप- कातळ.
खरपुडी - पापुद्रा.
खाजाळू - खाजरे अळू
गेलाडाव- कमीतकमी.
गडंगनेर- केळवण (लग्न-मुंज ठरल्याबद्दलचे जेवण).
गडणी- सखी.
गंधर्वविद्या- संगीतशास्त्र.
गुळगुळथापडी- कौतुकाने , प्रेमाने पाठीवर हळुवार थोपटणे.
गूत - गुंता.
लेप/लेपाटे- दुलई पेक्षा पातळ पांघरूण.
बावच्या - गवारीच्या शेंगा.
घुंगरट - डास किंवा त्यासारखा छोटा कीटक .
चाळशी - चष्मा.
डेरके - माठ (पाण्याचे भांडे ,डेरा)
दशमग्रह - जावयाला उद्देशून टोचून बोलणे (जामातो दशमोग्रह:)
दीठ - दृष्टी.
दुरडी - बांबूची टोपली.
पाणक्या - पाणी भरणारा
फद्या - तांब्याचे ४ किंवा सहा पैसे (माझ्या जवळ फद्या मिळणार
नाही)
बंद नाडी, कागदाचा लिहिण्याचा एक तुकडा. (फुलस्केप पेपरचा एक भाग)
बाळांबा कैरी
बिरडे काज-बटण
बैंगणी वांग्याच्या रंगाचा –रंगाची (साडी इ.)
बैठा पगार पेन्शन
भसभोंगळ सैल, निष्काळजी
मंदवासर शनिवार
रुंड धडापासून वेगळे झालेले डोके (रुंडमाळा)
रेखागणित भूमिती (जॉमेट्री)
रेंद/रेंदा चिखल
लगतमजकूर परिच्छेद न पाडता केलेले सलग लेखन
लंगूल/लांगुल शेपूट (लांगुल चालन करणे)
वल्मिक मुंग्यांचे वारुळ
वाइंसा/वाईंच अगदी थोडे
वावझड वा-याबरोबर येणारा पाऊस
विल्हेवारी विभागणी,वर्गवारी
विव्हळगौर सतत तक्रारी करणारी, रडगाणे गाणारी स्त्री
वेज सुईचे भोक (नाक)
वेला समुद्रकिनारा, वेळ,सीमा
वैजयंती काळी तुळस
शिकलगार शस्त्रांना धार लावणारा
शिराणी आनंद,सुख, आवड
शेखचिल्ली येडचापगिरी करणारा
शेजी शेजारीण
इहवृत्त स्थानिक बातम्या
उंडगा निर्लज्ज,आळशी
कुडण कुंपण
जांगळी गाईंचा कळप
जौळ अचानक येणारे वादळ
झीळ तजेला, चकचकीतपणा
नाकस्ता नुकसान (नाकस्त्याचे वर्ष)
शेरणी - मिठाई -
संजाब - शेंडिभोवतीचा केसांचा घेर
सांडणी- उंटीण (सांडणीस्वार)
हेल - हमाली
हेळकरी - हमाल
होन - सोन्याचे नाणे
ग
गचाड- गच्च, गर्द, घन (density)
गचोरा- The earing of corn (जोंधळे गचो-यास आले.)
गंजीकोट- खूप, पुष्कळ, अतिशय मोठे, विस्तारलेले (गंजीकोट कारखाना)
गडदा- एक विशिष्ट आकाराचे धातूचे भांडे
गरगा- खड्डा, भोक
गरवस, गरवा- उशिरा तयार होणारे धान्य, पीक
गरांटी- फळे वगैरे गोळ करण्यासाठी तयार केलेली हूक लावलेली काठी
गरी- माशाचा (हूक) गळ
गलांड- गळू, ट्यूमर
गळहाटा- गळ्हाटा= अस्ताव्यस्त, अव्यवस्थित, कठीण परिस्थिती
गांगा- तांबूस छटा असलेले पांढरे
गाजी- वीर, योद्धा, नायक
गांठले- खड्यांचा, पुतळ्यांचा हार
गाडदी- योद्धा, सैनिक (विशेषतः पेशव्यांच्या काळात सैन्यात नेमणूक केलेला
मुसलमान किंवा परदेशी सैनिक)
गाडछाट- गाडीसाठी केलेला रस्ता
गांधी- औषधे तयार करणारा (A Druggist)
घ
घटकेचे घड्याळ- शरीर किंवा जीवन यांसाठी वापरण्यात येणारा शब्द (क्षणभंगुर)
घडकाम- (लोहार, सोनार यांचे काम)
घडकामी- लोहार सोनारकाम करणारा
घडवंची- चौकट किंवा स्टॅंड (घडौंची)
घडवशी- मृदुंगासारख्या वाद्यासाठी केलेला स्टॅंड
घुमड- डोळ्याच्या पापणीच्या आत येणारा बारीक फोड
(घृतकुल्या- मधुकुल्या) घृतकुल्या- तुपाच्या नद्या (विशेषतः भरपूर तूप घालून
केलेल्या पदार्थाची मेजवानी)
घुंबरडा- कबुतराचे घुमणे
घुडगे- घुबड
घुरट- बकरा, वाघ, मांजर यांना येणारा उग्र वास
घुरप्या उंदीर- शेतातील उंदीर (चोरटा)
घुरमी- उत्सुकता, उतावीळपणा (excitement)
घेऊपाशरी, घेऊपाशे-या, घेऊबा, घेओबा- सदैव दुस-यासमोर हात पसरणारा,
घेण्यासाठी तत्पर परंतु काहीही देण्यासाठी नाखुषी
|